राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, कोणी पैसे मागितले होते का? रोजगाराच्या संधी देऊन उपलब्ध करून देऊन सक्षम बनवायचं सोडून हे कसंल काम

काल दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या मेळावे तुम्ही पाहिले ना, मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे हे इतिहासातच राहुन इकडून अब्दाली आला, तिकडून शाहिस्तेखान आला तिकडून अफजल खान आला असे सांगत इतिहासातलं सगळं सांगत होता. तर तिकडे पुष्पा सुरु आहे, एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवत मै आयेगा साला असे सांगत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखविली. पण दोघंही महाराष्ट्रातल्या प्रश्नावर कधी बोलणार आहेत की नाही असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित मनसेच्या मेळाव्यात आज राज ठाकरे बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना राज ठाकरे बोलताना म्हणाले की, या देशाला रतन टाटा सारखा सरळ, शुद्ध स्वभावाचा आणि कोणताही बडेजाव न करणारा उद्योगपती चालतो. मग तुम्हाला सरळ स्वभावाचा, शुद्ध स्वभावाचा राजकारणी का आवडत नाही असा सवाल उपस्थित करत धोकेबाज, निवडूण येईपर्यंत एका पक्षात आणि निवडूण आल्यानंतर दुसऱ्या पक्षात असले राजकारणी तुम्हाला चालतात कसे अशी विचारणाही यावेळी केली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, जर राज्यातील जनतेने योग्य निर्णय घेतला असता तर आज जे काही दिवसतय ते कधीच दिसलं नसतं. जर येत्या निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर जी महाराष्ट्रात जी घाण दिसेल ती कधी न बघितलेली घाण दिसेल. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण मी कधीच पाहिलं नाही. आठ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी एका सभेत ७० हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत घोटाळ्याबाजांना तुरुंगात टाकू असा इशारा दिला. त्यानंतर आठ दिवसात अजित पवार भाजपासोबत गेले. बरं अजित पवार यांना तुरुंगात टाकले का नाही तर त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. दुसऱ्याबाजूला मला शोधावं लागतं होत कोण कोणाच्या पक्षात आहे. हा आता ह्या पक्षात आहे, आता त्या पक्षा पक्षाकडे तिकीट मागतोय, तिकडे नाही मिळालं तर तो आपल्याकडे येणार आहे अशी खोचक टीका करत एकनाथ शिंदे आला कोणत्या पक्षात निवडून आला, कोणत्या पक्षात गेला आणि बरं हे सगळं झाल्यावर काम कोणासाठी करतयं असा सवालही यावेळी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, बरं सध्या राज्यात लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली पैसे वाटायचं काम सुरु आहे. बरं यांच्याकडे पैसे कोणी मागितले होते. पण त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलं आहे. निवडणूका तोंडावर आल्या ते येणार आणि तोंडावर पैसे टाकून मतं खरेदी करणार.म्हणून सध्या याला फुकट पैसे, त्याला फुकट पैसे. राज्यातील महिला इतक्या सक्षम आहेत की, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्या नक्कीच सक्षम होतील. पण यांना त्यांना ते करायचं नाही. त्यामुळेच माझ्या शेतकऱ्यांला मोफत वीज, शेतकऱ्याने कधी मागितली फुकट वीज, त्याचं म्हणण आहे की वीज द्या पण ती कमी पैशात द्या, पण यांनी मोफत वीज दिली. एकदा का फुकटच्या सवयी लागल्या की, तुमच्यासाठी सगळी अडचण निर्माण करून ठेवायची असे सांगत परिस्थिती अशीच राहिली तर फार फार तर या महिन्यात आणि त्याच्या पुढच्या महिन्यात लाडकी बहिणीचे पैसे मिळतील. त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारीपासून पैसेच मिळणार नाहीत. इतकेच नव्हे तर राज्याची परिस्थितीच तशीच राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

शरद पवार यांच्यावरी टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, बरं शरद पवार यांचं काय चाललय, त्यांनी आतापर्यंत काय केलं. सुरुवातीला शिवसेना फोडली त्यावेळी छगन भुजबळ यांना घेऊन गेले, नंतर नारायण राणे यांना घेऊन गेले. पक्षांची फोडाफोडी करण्याशिवाय दुसरं केलं तरी काय असा खोचक सवाल करत आता भाजपावाले काय करतायतं तेच करतायत असा टीकाही यावेळी केली. मला कळत नाही की भाजपावाल्यांना असली माणसं चालतात कशी असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जे पैसे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकावरून खर्च करण्यात येणारा निधी जर शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर खर्च केलात तर पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराज कसे होते काय होते हे किमान सांगता तरी येईल. बरं हे चीनच्या विरोधात बोलणार, आपली जमिन बळकावतायत असे सांगणार आणि गुजरात मध्ये उभारलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा जो उभारण्यात आलाय, चीनमधून आयात केलेला आहे. तो पुतळा काय देशात बनविलेला नाही असेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, जे पैसे मिळतायत ना ते पैसे घ्या, ते पैसे तुमचेच आहेत. मात्र पैसे घेतल्यानंतर मात्र मनसेच्या उमेदवारांना मतं द्या असे सांगत महाराष्ट्राची सत्ता एकदा माझ्या हाती द्या मग तुम्हाला कळेल की, सर्वात्तम राज्य कसे असेल ते कळेल. माझ्या सरकाराच्या काळात एकाही हात बिन कामाचा राहणार नाही. प्रत्येक हाताला काम देणार असल्याची घोषणा करत ते काम आता सारखं नाही तर रोजगाराचं काम देणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

अदानीवरून टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणी तरी तो अदानी येतो, तो तुमचे मिठागरांच्या जमिनी घेतो, तुमचे पोर्ट घेतो, जमिनी घेतो, विमानतळ घेतो. काल बाबा सिद्धीकी यांचा जो खून आला करण्यात आला त्यासाठीही हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील आरोपी येथे आले. आणि त्यांनी इथल्या सगळ्यांच्या समोर गोळीबार केला. अशी बाहेरून आलेली माणसं इथ येतात इथल्या लहान मुलींवर बलात्कार करतात, जमिनी घेतात. पण मी सांगितलं त्या प्रमाणे तुम्ही जमिनी विकू नका तुम्ही जमिनी विकल्या की तुमचं अस्तित्वच संपलं. त्यामुळे खो़ट्या महाराष्ट्राचं चित्र समोर न ठेवता मी जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ना कोणाच्या आघाडीत ना कोणाच्या युतीत एकला चलो रे असे चालणार असल्याचेही सभेच्या शेवटी जाहिर केले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *