राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या …
Read More »महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघात ५७ उमेदवारांचे ५८ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाची माहिती
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची …
Read More »कुर्ल्यातील शाळा शिक्षक मतदानाच्या दिवशीच निवडणूकीची कामे करणार निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती
कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत आणि मतदानाच्या एक दिवस आधी व मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन …
Read More »मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा कार्यक्रम
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार …
Read More »आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम
संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी ५० कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची …
Read More »लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ निवडणूक आयोगाची माहिती
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये …
Read More »अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार …
Read More »राज्यातील नवतरूण मतदारांमध्ये १२.८४ टक्क्यांची तर सर्वाधिक वाढ ३०-३९ वयोगटात केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची माहिती
आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुबार नावे डिलीट करण्याची मोहिम सुरु केली. त्याशिवाय सध्या लोकसभा मतदार संघापूरती मर्यादीत असलेली ही मोहिम आता विधानसभा मतदारसंघातही सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार …
Read More »पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलका प्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक …
Read More »२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद
मुंबईः प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »
Marathi e-Batmya