Tag Archives: fisherman

हवामान खात्याकडून १७ ते २१ ऑक्टोंबर पर्यंत जारी केली सूचना मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना

भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, … १० हजार लोकांवर बेरोजगारी मच्छिमार व्यवसायिकांच्या प्रश्नी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

ससून डॉक येथे १०० वर्षांपासून सुरु असलेल्या फिशिंग बोटींचे काम नवी मुंबईतील उरण कारंजा येथे हलवल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जवळपास १० हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणे अन्यायकारक आहे. सरकारने ससून डॉकमध्ये मच्छिमारी व्यवसाय करणारे व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने …

Read More »

केंद्रीय मत्स्य मंत्री रूपाला यांची घोषणा, मच्छिमारांसाठी एनडीआरएफचे निकष बदलणार मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन, बंदरांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे

राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी भुसे बोलत होते. …

Read More »

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या या मागणीच्या समर्थनासाठी भाजपाची स्वाक्षरी मोहीम

मराठी ई-बातम्या टीम मुळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण कोळीवाड्यातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपातर्फे दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत …

Read More »

मत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/जलाशयाची चालू वर्षाची ठेका तलाव रक्कम भरण्यास तसेच मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे आणि मत्स्य बीज केंद्राची रक्कम भरणे आदीसह …

Read More »

सरकार देणार मच्छिमारांना १० ते ३० हजाराचे आर्थिक सहाय्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या “क्यार”  व  “महा” या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ …

Read More »