गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास रु. ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, मुंबईकरांच्या २५ हजारांहून अधिक इमारतींना ओसी देण्याबाबत धोरण शासन धोरण तयार करणार
महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा …
Read More »अजित पवार यांची घोषणा, पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा यशदा करणार
पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. …
Read More »आशिष शेलार यांचे आदेश, सर्व यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीत दिले प्रशासनाला आदेश
जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न …
Read More »१ मे स्थापना दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना गिरीश महाजनांना नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब
नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना १ मे महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनाचा मान भाजप नेते मंत्री गिरीश महाजन व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दोघांच्या नावावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले आहे. …
Read More »अजित पवार यांच्या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून …
Read More »स्वारगेट बलात्कार प्रकरणी आदेश देण्यास पालकमंत्री अजित पवार यांना लागले १२ तास स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
मुंबईनंतर वर्दळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन पुणे शहराच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षिय युवतीवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी राज्यातील राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र या घटनेची सविस्तर माहिती कळण्यास एक नाही दोन …
Read More »पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारः घटनेचे राजकिय पडसाद विरोधकांकडून पुणे पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीकास्त्रः आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात
मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »‘जीबीएस’संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे-पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार "भारत, भारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय …
Read More »
Marathi e-Batmya