Tag Archives: gurdian minister

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली गावांची केली पाहणी

बीड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात नदीचे पाणी घरात व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्यात अद्यावत क्रीडा संकुल विकसित करणार विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार

आजच्या युगात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व आहे. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत खेळाडूंना देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई उपनगर जिल्ह्यात या वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक अद्यावत क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून यामध्ये विविध प्रकारांच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असतील असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र …

Read More »

काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा

गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

या जिल्ह्यात हे पालकमंत्री स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करणार स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालयात; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येत्या शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता राष्ट्रध्वजारोहण केले जाईल. पुण्यातील कार्यक्रमात राज्यपाल ध्वजारोहण करतील. जिल्हा मुख्यालयांवर मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन …

Read More »

मंडप खड्ड्यासाठी आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा देण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका

मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाख देणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद'

ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, मुंबईकरांसाठी राज्य सरकार वेगाने निर्णय घेतेय चर्नी रोड रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सुरु

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन वेगाने निर्णय घेत आहे. शहराचे सौंदर्यीकरण वाढवणे, अधिकाधिक मुलभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यामुळेच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरु करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील …

Read More »

दिपक केसरकर यांची ग्वाही, मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. फोर सेशन हॉटेल, वरळी येथे …

Read More »

अजित पवार यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, तर मी गुरूमंत्र देईन…

राज्यात सत्तांतरानंतर अगोदर विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि नंतर जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न करत विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. अखेर काल (शनिवार) राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे …

Read More »