Breaking News

Tag Archives: j.p. nadda

जे पी नड्डा यांची टीका म्हणे, राहुल गांधी अयशस्वी ठरलेले उत्पादन मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित केली काँग्रेसवर टिका

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील एका विद्यापीठात घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान देशाच्या मालमत्तेत कोणत्या जात समूहाची भागीदारी किती या मुद्याचे विश्लेषण करताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. …

Read More »

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे …

Read More »

डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आदेश

राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी …

Read More »

एनडीए नेत्यांच्या उपस्थित टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बंदी संजय, भारताचे माजी सरन्यायाधीश …

Read More »

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना …

Read More »

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे जाहिर नामे प्रसिध्द झाले. यापैकी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्याची चर्चा सर्वचस्तरामध्ये झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूकीच्या कालावधीत जाहिरनामा प्रसिध्द करण्यापासून ते जाहिरनामा पर्यंत भाजपाच आघाडीवर असते. परंतु …

Read More »

तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब

दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाला अद्याप एके ठिकाणीही शिरकाव करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतची आघाडी तोडलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साद घातली. परंतु नाय-होय, होय-नाय म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला प्रतिसाद दिला. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते पवन …

Read More »

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, २८ आमदारांचा नव्याने समावेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने विजय मिळवित सत्ता कायम राखली. त्यानंतर मागील ७ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्याऐवजी राज्याची धुरा अर्थात मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांची निवड केली. या साऱ्या घटनेला १२ दिवसही पूर्ण होत नाही तोच मध्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला. १२ …

Read More »

मोदी सरकारचा फतवाः अधिकाऱ्यांनो रथयात्रा काढा, काँग्रेसची टीका सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशभरातील प्रमुख राजकिय पक्ष निवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारमधील बहुसंख्य खासदार, मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही प्रचाराच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित …

Read More »

जयराम रमेश यांच्याकडून इमारतीला मोदी मल्टीप्लेक्सची उपमा तर भाजपा म्हणते… भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

पाचच दिवसांपूर्वी गणेश चर्तुर्थीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाच्या इमारतीत प्रवेश करत संसदेचे विशेष अधिवेशनही घेण्यात आले. मात्र या संसद भवनाच्या नव्या इमारतीला मोदी मल्टीप्लेक्स किंवा मोदी मैरियट असे म्हणायला पाहिजे अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत केली. जयराम रमेश म्हणाले, तसेच या संसदेच्या नव्या इमारतीच्या …

Read More »