मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेतंर्गत घरकुलाचे काम व्यापक प्रमाणात सुरु असून त्याअंतर्गत ७२ हजार ९७ घरकुल पूर्ण झाले असल्याचे सांगून भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पुढील उद्दीष्टेही गतीने पूर्ण करावे, असे निर्दैशही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. ग्रामीण गृहनिर्माणाच्या …
Read More »प्रकाश आबिटकर आणि जयकुमार गोरे यांचे आदेश, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाही करा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिका, एएनएम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समकक्ष पदांवर समावेश करून त्यांना नियमित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या विषयावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत संयुक्त बैठकीत ते …
Read More »जयकुमार गोरे यांचे आदेश, ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश
ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले, महिलेला न्याय देण्यासाठी एक दोन वेळा फोन मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपावर केले भाष्य
काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाचे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पाठविलेल्या अर्धनग्न फोटोवरून राजकिय वाद रंगलेला असतानाच या प्रकरणाला आता ब्लॅकमेलिंगचे वळण मिळाले आहे. त्यातच या प्रकरणी आरोपीचा संबध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा, राज्य महिला आयोगाची संकल्पना बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंदी साठी होणार ठराव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या ८ मार्च २०२५ रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आय़ोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व …
Read More »देशातील पहिला कॅनल जोड प्रकल्प सोलापूरात, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता
नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. …
Read More »भाजपा आमदार जयकुमार गोरे अखेर न्यायालयात शरण मृत व्यक्तीला जीवंत असल्याचे दाखवित जमिन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी गावातील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यत धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा न दिल्याने आज अखेर जिल्हा न्यालयात शरण आले. यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी …
Read More »ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही सर्व फंडातून निधी उपलब्ध करून देणार-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ग्वाही
मागील काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच या घटना प्रामुख्याने शाळेच्या आवारातच घ़डत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टी कोणातून सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. विधानसभेत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दा काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान …
Read More »ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …
Read More »भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार
मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »
Marathi e-Batmya