मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला होता. मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागात फक्त ढग जमा झाले आहेत. पण अद्याप मराठवाड्यात मान्सून …
Read More »गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मुंबई : प्रतिनिधी काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा …
Read More »कोंकणवासियांना खुषखबरः वाहनांना टोलमाफी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या …
Read More »ऑगस्टच्या या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय हवामान खात्याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेला पाऊस ३० ऑगस्टपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. वास्तविक पाहता रविवारपासूनच पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. तर ३० तारखेला पावसाचा चांगलाच जोर चांगलाच वाढणार असून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार …
Read More »पूरग्रस्त दुकानदार, मच्छिमार,सर्वसामान्य, कारागीरांना असे होणार ११ हजार ५०० कोटींचे वाटप आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या …
Read More »फडणवीसांची मागणी, पूरग्रस्तांसाठी आणि बाधित भागासाठी या २६ गोष्टी करा पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंकडे केल्या या मागण्या.
मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. २५ जुलै …
Read More »अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज-मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व …
Read More »पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळेल नागरिकांना तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी …
Read More »पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त …
Read More »
Marathi e-Batmya