मुंबईतील जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला जडला असून संपूर्ण मुंबई त्यांना गिळायची आहे आणि त्यासाठी भाजपा सरकार स्थानिकांचा विरोध डावलून अदानीला जमिनी देत सुटले आहे. कुर्ला मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानीच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही या सरेंडर सरकारने …
Read More »अपात्र धारावीकरांचे पुर्नवसन कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणा
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मदर डेअरी अर्थात मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा, …. जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही मुंबईकरांचा आवाज दडपण्यासाठी मोदानी सरकारकडून पोलीस बळाचा वापर
अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट भाजपा सरकारने पोलीसांना पुढे करुन आंदोलकांना रोखले, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदानी सरकारने कितीही …
Read More »१० कोटी खर्चून बांधलेल्या कुर्ल्यातील काजूपाडा रस्त्यावर भेगा अनिल गलगली यांची कारवाईची मागणी
१० कोटी खर्चून बांधलेल्या कुर्ल्यातील काजूपाडा रस्त्यावर भेगा पडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कुर्ला एल वॉर्डातील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काजूपाडा रस्त्यावर पडलेल्या भेगांबाबत योग्य कार्यवाही करणे व संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर …
Read More »कुर्ला बेस्ट बस दुर्घटना प्रकरणीः चालक संजय मोरेला कोठडी चालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेप्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला आज मुंबईतील न्यायालयाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संजय मोरे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४८ …
Read More »खा वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, प्रत्येकी २५ लाख द्या
कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, …
Read More »कुर्ल्यातील शाळा शिक्षक मतदानाच्या दिवशीच निवडणूकीची कामे करणार निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती
कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत आणि मतदानाच्या एक दिवस आधी व मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस प्रकल्पाला गती द्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटीस महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेने सॅटीस प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. कुर्ला मतदारसंघातील विविध प्रश्नांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार …
Read More »एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन
प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून …
Read More »नाना पटोलेंचा आरोप, कुर्ल्यातील भारत कोल कंपाऊड मधील उद्योग बंद करुन जागा बिल्डरच्या घशात उद्योग व कामगार वाचवा व भ्रष्ट बीएमसी अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करा
कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक …
Read More »
Marathi e-Batmya