Tag Archives: Ladki Bahin Yojana

अजित पवार यांची माहिती, महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात थाटात साजरा...

महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले. अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी …

Read More »

लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तळीराम बंधूच्या खिशात राज्य सरकारचा हात महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी दारू महागणार, मंत्रिमंडळाने दारूवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला

मागील काही महिन्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना देण्याच्या रकमेचा अधिभार पडत असल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका होवू लागल्याने अखेर राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या मासिक हप्त्यासाठी राज्यातील भारतीय बनावटीच्या आणि परदेशी मद्याच्या किंमतीत वाढ …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,….हे धाडस कुठून येते? गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

विधानसभेत मंत्री उदय सामंत यांच्याकडून पुरवणी मागण्या सादरः लाडक्या बहिणीसाठी १४०० कोटी ३५ हजार ७८८ कोटींच्या मागण्या सादर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीने माझी लाडकी बहिण योजनेतील रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सोमवारी ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यात आपल्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेसाठी १,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावेळी पुरवणी …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, लाडकी बहीण’ च्या जाहिरातबाजीवर युतीकडून २०० कोटींची उधळपट्टी भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?

काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली असल्याचा …

Read More »

सुनिल तटकरे यांचा टोला,… ठाकरेंना दिलेली सुरक्षा पाळत ठेवण्यासाठी होती का? महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी

महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी आहेत. अत्याचार करणार्‍या नराधम विकृत प्रवृत्ती ठेचून काढल्या गेल्या पाहिजेत हे पक्षाचे आणि वैयक्तिक मत आहे आणि सरकारमधील सर्व नेत्यांचेही तेच मत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना सुनिल तटकरे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शासकिय केंद्रावर भरले जाणारे अर्जच ग्राह्य पैसे मागणाऱ्याला तुरुंगात पाठवा

नुकतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहिर केल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी लाडका भाऊ योजना जाहिर केली. तसेच महिलांप्रमाणे राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महिना ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रूपयांचे मासिक भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी काही राज्य सरकारी …

Read More »