Tag Archives: local bodies election

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून महापालिका निवडणूकीची घोषणा राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे …

Read More »

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका मुख्य निवडणूक अधिकारी यांची प्रसार माध्यमांना सूचना

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याचे काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण अद्याप एफआयआरही दाखल केलेला नाही. हे सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे आहे, असा गंभीर …

Read More »

एकनाथ शिंदे यांची टीका, मुख्यमंत्री असताना घरात बसलात, आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरताय नगरभकास मंत्री म्हणत केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरमरीत प्रत्युत्तर

मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही, जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय… पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका, या आमच्यासारखे देणारे हात बना, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही — आम्ही ‘देना बँक’ आहोत, ते मात्र ‘लेना बँक’ आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

एकनाथ शिंदे यांची टीका, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकणार

नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा”, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणशिंगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून फुंकले. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, मतदार याद्यांमधील घोळ दूर करुन निवडणुका घ्या महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, दिल्लीला जात …

Read More »

दिनेश वाघमारे यांची घोषणा, २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान ३ डिसेंबर २०२५ मतमोजणी- राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …

Read More »

राज ठाकरे यांचे सत्याचा मोर्चावेळी आदेश, दुबारवाले दिसले की त्यांना फटकावा आणि मगच… नोंदणीकृत मतदारांपेक्षा दुबार वाल्यांची नावे सर्वाधिक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …

Read More »