समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री …
Read More »पालकमंत्री आणि आयुक्त, महापालिकेच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कारवाई कधी? मुंबईतल्या शासकिय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाला महापालिकेचे पाठबळ
राज्यात सत्तेवर कोणीही येवो पण मुंबईत अनिधिकृत बांधकाम वाल्यांचे पेव काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या शासकिय जमिनीवर वाढलेले अनधिकृत झोपडपट्ट्या किंवा सध्याच्या काळात नव्याने सिमेंट काँक्रीटच्या इमारती या मुंबई महापालिकेच्या आर्शिवादाशिवाय उभारल्या नसल्याची एक कागदोपत्री घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मराठी ई-बातम्या.कॉम यासंकेतस्थळाकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रे …
Read More »मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासीयांसाठी बांधणार ४० हजार शौचालये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे (प.) नित्यानंद नगर येथील लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयांचे आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची …
Read More »गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा …
Read More »येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली. मंत्रालय …
Read More »आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?
राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव…
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण २५० विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करीत आहोत. या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या …
Read More »राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक …
Read More »राज्यातील ६० हजारांहून अधिक बालकांना मिळणार या योजनेचा लाभ
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ६० हजारांहून जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी यापूर्वी विभागाच्या असलेल्या वेगवेगळया मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी सर्वसमावेशक शासननिर्णय काढला असून या योजनेला ‘क्रांतिज्योती …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »
Marathi e-Batmya