Tag Archives: manoj jarange patil

गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारे ते तिघे कोण ? आरक्षणासाठी यातील एकाने जाळली होती स्वतःची गाडी सदावर्ते यांची फुल्ली ऑक्टोमॅटिक गाडी फोडणारे ते तीन मराठा आंदोलक कोण ?

मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची पहाटे सकाळी मराठा आंदोलनकांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तसेच सदावर्ते यांच्या इमारतीबाहेर पोलिसांची गाडी सुद्धा उभी करण्यात आली आहे. प्रथमदर्शी यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची …

Read More »

अजित पवार यांनी स्पष्टच केले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता… राज्यात जातीनिहाय जनगणना करा

ओबीसी समाजाला आणि अनुसूचित जाती-जमातीसह सध्या ६२ टक्के आरक्षण असून मराठा समाजाला उरलेल्या ३८ टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू आहे. मात्र, ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे भावनिक आवाहन, …भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तसेच २५ तारखेला मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी पुढील रणनीती जाहिर करणार असल्याची घोषणा करत आमरण कडक उपोषण करणार असल्याचे जाहिर केले. तसेच जोपर्यंत मराठा समजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत गावाची सीमाही शिवू देणार नाही असा …

Read More »

…देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय आ. प्रविण दरेकर यांचा आरोप

आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने त्यांना टार्गेट केले जातेय, असा आरोप दरेकर यांनी केला. …

Read More »

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी केल्या मराठा आरक्षणासह या प्रमुख मागण्या १० दिवसात आरक्षण द्या

माझी या मराठ्याच्या मुलाची राज्य आणि केंद्र सरकारला एकच शेवटची विनंती असून तुम्हाला दिलेले एक महिन्याची मुदत संपत आली आहे. फक्त १० दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही समिती नेमली आहे तिचे काम थांबवा आणि सर्व मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहिर करा अन्यथा २२ …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले, राजकारणात उतरणार…. मराठा समाजाला आरक्षणांचा लढा महत्वाचा

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला अल्टीमेटम देत सरकारच्या धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार मनोज जरांगे पाटील यांनी उपसले. अखेर जरांगे पाटील यांच्या मागण्यासमोर राज्य सरकारने माघार घेत एका महिन्यात ओबीसी समाजातील कुणबी समुदायाला मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरु केला. …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात मुख्यमंत्री शिंदेंनी तोडगा काढला ते … पूर्ण न होणारी आश्वासन दिली नसतील अशी आशा

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो असे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे …

Read More »

अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »