अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर चढून हल्लाबोल आंदोलन केले. ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयातच आंदोलन सुरु केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी सुरक्षा जाळीवर चढत ५ ते ६ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी …
Read More »‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …
Read More »राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकपेक्षा भ्रष्ट… लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ …
Read More »कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देणार वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून …
Read More »मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन आठभर चित्रप्रदर्शन राहणार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये …
Read More »मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आता मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची माहिती
मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य …
Read More »स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली
राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा …
Read More »प्रेयसीच्या आत्महत्येचा तपास नीट होत नसल्याने प्रियकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्याने आष्टी येथील प्रौढाचा प्रयत्न
प्रेयसीने केलेल्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून नीट होत नसल्याचे गाऱ्हाणे घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेला होता. मात्र तेथे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसल्याने अखेर या प्रियकराने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात आल्याने सदर व्यक्तीला कोणत्याही पध्दतीची फारशी …
Read More »
Marathi e-Batmya