लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार …
Read More »शनिवार वाड्यात नमाज पठण ? भाजपा खासदार मेधा कुलकर्णी पतित पावनच्या कार्यकर्त्यांसोबत गोमूत्र शिंपून जागेचे शुद्धीकरण केले
उभ्या महाराष्ट्राला मनूवादी विचारणीची ओळख आणि त्याची शिल्लक अवशेष असलेल्या पेशव्यांच्या शनिवार वाडा येथे काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण करताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुण्याच्या भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यानी रा. स्व.संघ प्रणित पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाड्यातील त्या जागेचे गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच …
Read More »खासदार नरेश मस्के यांचा इशारा, तर गणेश नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ प्रदर्शित करू शिवसेनेचा भाजपाच्या गणेश नाईक यांना कडक इशारा
आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत अहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील, असा कडक शब्दात शिवसेनेने एका पत्रकार परिषदेत गणेश नाईक …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांच्या बिल्डर मित्रावर सरकार मेहरबान जुहूचा ८०० कोटींचा महापालिकेचा भूखंड बिल्डरच्या घशात
देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल
मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...
राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …
Read More »खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …
Read More »शशी थरूर यांची केरळवर टीका, तुर्कीला १० कोटी देण्याचा निर्णय चुकीचा पाकिस्तानला तुर्कीने मदत करत चुकीचे औदार्य दाखवले
बहुपक्षीय शिष्टमंडळांद्वारे ऑपरेशन सिंदूरवर भारताच्या जागतिक शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान, २०२३ मध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर केरळच्या एलडीएफ LDF-च्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तुर्कीला दिलेल्या आर्थिक मदतीवरून वाद निर्माण झाला. काँग्रेसचे खासदार आणि परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने दोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानला दिलेल्या १० कोटी रुपयांच्या मदतीवर …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या एनडीए आणि भाजपा नेत्यांना सूचना, वादग्रस्त वक्तव्ये टाळा मध्य प्रदेश, हरियाणामधील भाजपा नेत्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केली सूचना
रविवारी दिल्लीत झालेल्या एनडीए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सुशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या बैठकीत एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या अनावश्यक विधानांवर चिंता व्यक्त केली आणि त्यांना अविवेकी भाष्य करण्यापासून परावृत्त …
Read More »
Marathi e-Batmya