रविवारी दिल्लीत झालेल्या एनडीए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सुशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या बैठकीत एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या अनावश्यक विधानांवर चिंता व्यक्त केली आणि त्यांना अविवेकी भाष्य करण्यापासून परावृत्त …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती
मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, कोस्टल रोड लगतची जागा विकास आराखड्यासाठी आरक्षित करा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा
मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदनाचे दिले पत्र
भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …
Read More »रविंद्र वायकर यांच्या खासदारकीबाबत उच्च न्यायालय काय देणार निकाल? कीर्तीकर यांच्या निवडणूक याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला शिवसेना गटाचे (उबाठा) उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या याचिकेवरील दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. अमोल कीर्तीकर यांनी याचिकेत उपस्थित केलेला मुख्य मुद्दा टेंडर मतांशी संबंधित आहे. अमोल …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री
मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, …पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागावी पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यावेळी मविआचे निषेध आंदोलन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते, पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला …
Read More »सीआयएसएफच्या महिला सुरक्षा कर्मचारीने कंगना राणौत यांच्या श्रीमुखात भडकावली शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्यावरून मारली
चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिनेता-राजकारणी बनलेल्या खासदार कंगना राणौतने यांच्या श्रीमुखात लगावल्याचा आरोप केला. साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) पोलिसांनी द हिंदूला पुष्टी केली की कंगणा राणौत आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाची घटना घडली. सदर सीआयएसएफने कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने …
Read More »चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …
Read More »
Marathi e-Batmya