Breaking News

Tag Archives: minister uday samant

उद्योग विभाग आणि लुब्रिझोल इंडिया दरम्यान सामंजस्य करार ; १२० एकर जागेचे वाटपपत्र सुपूर्द ‘लुब्रिझोल’च्या बिडकीन येथील प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाबरोबरच रोजगार निर्मिती

लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योग …

Read More »

मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पुणेकरांना निकषानुसार मदत मंत्री उदय सामंत यांचे विधानसभेत आश्वासन

पुणे शहरातील धानोरी कालवड, येरवडा व लोहगाव परिसरात ४ जून २०२४ रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. धानोरी रस्त्यावरून पावसाचे पाणी काही नागरिकांची घरे व दुकानांमध्ये शिरले. या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याबाबत सदस्य सुनील टिंगरे …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील  परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात …

Read More »

कन्नमवारनगर, विक्रोळी येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. …

Read More »

उस्ताद झाकीर हुसेन आणि शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाकडून एल.एल.डी. व डी. लिटने सन्मानित राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाकडून पदवी बहाल

जागतिक कीर्तीचे तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन व प्रसिध्द उद्योजक शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाने मानद एल.एल.डी. व डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला, हे अत्यंत अभिनंदनीय असून अशा सन्मानामुळे नव्या पीढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात …

Read More »

आता या अभ्यासक्रमाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार नॅसकॉमचे प्रशिक्षण कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन …

Read More »

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. …

Read More »

उच्च शिक्षणमंत्री सामंताची मोठी घोषणा, परिक्षेचा वेळ वाढविला ऑफलाईन परिक्षेचा कालावधी प्रती तास १५ मिनिटांनी वाढविला

मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काँलेज आणि महाविद्यालयात न जाता ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे अनेक परिक्षा याही ऑनलाईन पध्दतीने घ्याव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिखानाचा सराव कमी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी वाढीव वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण …

Read More »

महाविकास आघाडीतील “हे” मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात आघाडीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे धक्कादायक माहिती राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत पुढे आली आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या …

Read More »

विद्यापीठ विधेयकातील “या” तरतूदींवरून मुनगंटीवारांचा सरकारला सवाल मंडळावरील सदस्यांच्या त्या गोष्टी कोण तपासणार?

मराठी ई-बातम्या टीम विधानसभेत संध्याकाळी सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मान्यतेसाठी आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना चांगलेच धारेवर धरत या दुरूस्ती विधेयकातील त्या तरतूदींनुसार नियुक्त करण्यात येणार असलेल्या व्यक्तींची तपासणी कशी करणार असा सवाल यावेळी उपस्थित केला. सार्वजनिक विद्यापीठ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर त्यावरील …

Read More »