Tag Archives: mns

मनसे झाला आता २० वर्षाचा युवक, रायगडापासून सदस्य नोंदणीला सुरुवात राज ठाकरे यांच्या नावापासून सदस्य नोंदणीला होणार सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी …

Read More »

विमान अपघात प्रकरणी राज ठाकरे म्हणाले, एफआय़आरला सरकार का घाबरतंय रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती दिली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषदत घेत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. तसेच मुंबई पुणे येथील पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी एफआयआर घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यातच …

Read More »

राज ठाकरे यांचा मोहन भागवत यांना टोला, गुजरातमध्ये समरसतेचे धडे का नाही दिलेत? आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत ?

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.  या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व …

Read More »

राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या राज्य निवडणूक आयोगाने जारी केली माहिती

मागील ७ ते नऊ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. तर आज या महानगरपालिकांचे निकाल मतमोजणीनंतर जाहिर करण्यात आले. मात्र आज झालेल्या मतमोजणीत चंद्रपूर, कोल्हापूर वगळता जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तसेच बहुतांश ठिकाणी महापालिकांच्या …

Read More »

मुंबईत ठाकरे बंधूंना, तर पुण्यात पवार काका-पुतण्याला भाजपाचा धक्का काटे की टक्कर देत मुंबई आणि पुण्यात भाजपाने सत्तेची दारं स्वतःसाठी उघडली

साधारणतः आठ ते नऊ वर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदान घेतले. त्यानंतर आज या सर्व निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. मागील १० ते १५ वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला अखेर यश …

Read More »

मुंबईचा महापौर कोणाचा महायुती की ठाकरे बंधूंचा? एक्झिट पोल्स काय म्हणतात १३० जागा महायुतीला मिळणार असल्याचा दावा

बहुतेक एक्झिट पोलनुसार, भाजपा-शिवसेना युती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) या प्रतिष्ठेच्या लढाईत विजय मिळवण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत ही युती १३० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने भाजप-शिवसेना युतीला १३१-१५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तर जेव्हीसीने या युतीसाठी १३८ …

Read More »

महानगरपालिका मतदानावेळी गोंधळात गोंधळ, नावे गायब, शाई पुसली जाण्याचा प्रकार नवा विरोधकांकडून गोंधळावर भाष्य करताच, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची खिल्ली

जवळपास ७ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र राज्यातील अनेक निवडणूक केंद्रावर भल्या सकाळीच ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या त्यामुळे उशिराने मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये मुंबईतील मतदान केंद्रांपासून ते विदर्भातील काही मतदान केंद्रापर्यंत अशा घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी मतदारांची नावे दरवेळीच्या …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या आदेश जुनाच

महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे. जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह …

Read More »

भाजपाच्या अण्णामलाई यांचे ठाकरे बंधू यांना आव्हान, पाय छाटून दाखवा राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोण मला धमकावत आहेत

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा चांगलाच ज्वर वाढला आहे. त्यातच या निवडणूकीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्रित आले. तसेच मनसे-शिवसेना उबाठाच्यावतीने नुकतेच प्रचाराच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क येथे जाहिर सभा झाली. नेमक्या याच कालावधीत मुंबईच्या महापौर पदावरून …

Read More »

राज ठाकरे यांनी मुंबईसह देशातील अदानीला दिलेल्या प्रकल्पाची यादी दाखवत म्हणाले… मुंबईला गुजरातला नेऊन जोडण्याचे षडयंत्र सुरुय

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईसह संपूर्ण देशभरात मागील १० वर्षात भाजपा सरकारच्या आर्शिवादाने एका अदानीला किती प्रकल्प देण्यात आले याचा नकाशा दाखवत पुढे म्हणाले की, अदानीसाठी …

Read More »