महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या ‘पटक पटक के मरेंगे’ (तुम्हाला मारेन) या वक्तव्यावर पलटवार करताना ओ दुबे तुम मुंबई मे आ, तुम्हे समंदर मे डुबो डुबो के मारेंगे असे प्रत्युत्तर देत पलटवार केला. त्यावर निशिकांत दुबे याने पुन्हा राज ठाकरे यांना डिवचण्यासाठी …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए- अदानीला कोणी दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे रिअल इस्टेट साम्राज्य उभारण्याचा प्रकल्प
धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीकरांचे हित साधले जाणार नाही तर फक्त आणि फक्त अदानीचे टॉवर उभे राहणार आहेत. पण अदानी सरकार व अदानीचे दलाल जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. काँग्रेस व धारावीकरांचा अदानी विनाश प्रकल्पाला विरोध आहे. या …
Read More »रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …
Read More »दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आंदोलनावरून भाजपामध्ये ठिणगी खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपाच्या शहराध्यक्षामध्ये सुरु झाला वाद
पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले ही घटना समोर आल्यानंतर विविध पक्ष संघटनांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. भाजपाच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल,… मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? सीबीएसई बोर्ड सुरु करण्यावरून राज्य सरकारला सवाल
राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे नेतृत्व हरपले खा. वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन
प्रख्यात अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसच्या …
Read More »शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या पाठीशी कोणते आमदार? बहुतांष आमदारांचा अजित पवारांच्या बाजूनं कल
मागील काही महिन्यापासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अजित …
Read More »नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी
राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर …
Read More »अरविंद सावंत यांची खोचक टीका, घोषणा ७५ हजाराची आणि नियुक्ती पत्रे दोन हजार
मागील तीन महिन्यात राज्यातून तीन मोठे गुंतवणूकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेले. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील बेरोजगारांना शासकिय नोकरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यावरून उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन
केंद्र सरकारने तेलबिया आणि सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. डॉ. बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकारने …
Read More »
Marathi e-Batmya