सध्या कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी …
Read More »विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या टीकेला भाजपाचे उत्तर, वेळ आली की मैदान सोडून… भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिले टिकेला उत्तर
बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी मंत्र्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू जागे संदर्भात पाठविलेल्या पत्राचा दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगांव येथील स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर महाडमध्ये झालेल्या सभेत …
Read More »सुप्रिया सुळे यांच्या नव्या जबाबदारीबाबत शरद पवार यांचे वक्तव्य, कोणतीही जबाबदारी घेण्यास.. लोकसभा निवडणूक होईपर्यंत जबाबदारी नाही
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांचा राजीनामा स्विकारण्यास विरोध केला. तर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी शरद पवार यांना वैयक्तिक फोनवरून राजीनाम्याचा निर्णय मागे …
Read More »पुन्हा एकदा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खासदार सुप्रिया सुळे यांची मोहोर संसदेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून केले सिद्ध
संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग… उपस्थिती… विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके… यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. दरम्यान आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे. देशाचे सर्वोच्च सभागृह …
Read More »उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, युनोस्कोच्या त्या नियमानुसार बारसूत प्रकल्प होऊच शकत नाही जमिनी व्यापारी लोकप्रतिनिधींना अमराठी लोकांना विकू नका
कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफानरीच्या प्रकल्पावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ या रिफायनरी प्रकल्पावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही कोकणचा दौरा करत रत्नागिरी येथील स्व.प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या मैदानावर जाहिर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांच्या …
Read More »येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक सवाल,… भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? कातळशिल्पे वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविणार
जागतिक वारसा वास्तूचा ठेवा असलेली कातळशिल्पे सोलगांव येथे असून बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पामुळे ही कातळशिल्प धोक्यात येणार आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे वाचविण्यासाठी आपण जागतिक संघटनेला पत्र लिहिणार असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे त्याची आठवणही पर्यावरण संघटनेला पत्र पाठवून करू देणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …
Read More »भाजपा आमदार नितेश राणे यांचा सवाल, ठाकरेंना जन की… समजते की धन की बात १०० खोक्यांसाठी बारसूचा पत्र व्यवहार केल्याचा आरोप
ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आले असून सोलगांव, बारसू येथील स्थानिक नागरिकांशी बारसू रिफायनरीवरून संवाद साधला. तर, भाजपानेही रिफायनरी समर्थनार्थ कोकणात कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना कोकणात परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्याकरता भाजपा …
Read More »
Marathi e-Batmya