Tag Archives: Nagpur Violence

आमदार रईस शेख यांची मागणी, विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या शाळेवर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील दयानंद आर्य कन्या संस्थेवर कठोर कारवाई करावी

नागपूरातील हिंसाचारानंतर धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य कन्या विद्यालया’ने प्रवेश नाकारले, त्या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांप्रती कोणताही धार्मिक भेदभाव करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकिद राज्यातील सर्व शाळांना देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

हिंसाचार प्रकरणी घर पाडणाऱ्या नागपूर महापालिकेची मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मागितली बिनशर्त माफी

अलिकडच्या जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरांचे कथित बेकायदेशीर भाग पाडणे आणि इमारती पाडण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे “बिनशर्त माफी” मागितली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर एनएमसीने आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

नागपूर प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझरः उच्च न्यायालयाने फटकारले अधिकाऱ्यांच्या वर्तनावर केले प्रश्नचिन्ह उभा

नागपूर शहरातील अलिकडच्या जातीय हिंसाचारात आरोपी म्हणून नाव असलेल्या व्यक्तींची घरे पाडण्यात ‘उद्धट’ दृष्टिकोन बाळगल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नागपूर महानगरपालिकेला (एनएमसी) फटकारले. मुख्य आरोपी फहीम खानची आई जेरुनिसा शमीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. त्यांनी खंडपीठाला सांगितले की २१ …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर व सोलापुरकरांवर काय कारवाई केली? हे कोणाचे हस्तक आहेत ?

नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण …

Read More »

त्या गाण्यावरून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कामराने अयोग्य केलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान चालतो अन् गद्दारांचा अपमान चालत नाही

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी

नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. संजय …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल,… मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? सीबीएसई बोर्ड सुरु करण्यावरून राज्य सरकारला सवाल

राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जावीपूर्वक हल्ला महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट नागपूरातील हिंसाचाराच्या घटनेवर व्यक्त केली प्रतिक्रिया

नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत या मागे राज्य सरकारमधील एक विषारी मंत्री उघडपणे द्वेष पसरवित असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत …

Read More »