स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा शो ज्या ठिकाणी रेकॉर्ड झाला, त्या तो रेकॉर्डींग स्टुडिओवर हल्ला करत स्टुडिओची मोडतोड करण्यात आली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कुणाल कामरा याने काहीही चुकीचं केलं नसल्याचे सांगत एकप्रकारे पाठराखण केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणाल कामराने सत्यात्मक गाणं केलं आहे. सत्य आहे त्या जनभावना मांडल्या आहेत. आम्ही जे बोलतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की, काल कामराच्या इथे जी तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केली नाही, त्याचा शिवसेनेशी संबध नाही. ती कदाचीत एशिंशि (एकनाथ शिंदे यांची शिवसेना) गटाने केली असेल, मुळात जे राज्य चाललंय शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललंय की गद्दारांच्या दिशने चाललय याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल जे भेकडं लोक आहेत, त्यांना त्या गाण्यावरून त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं असेल म्हणून त्यांनी ती तोडफोड केली असेल, ह्या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरने अपमान केल्याचे दिसत नाही, राहुल सोलापूरकरने अपमान केल्याचे दिसत नाही. कोश्यारींनी अपमान केल्याचे दिसून आले नाही कोश्यारींचा निषेध करण्याचे धाडस यांच्यात नाही. हे भेकड आणि गद्दार लोकचं असल्याची टीकाही यावेळी केली. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं नाही असं माझं मत असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) महोदयांना आम्ही सांगू इच्छितो की, न्याय सगळ्यांना सारखाच पाहिजे, नागपूरमध्ये ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात, तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा त्याने ज्या स्टुडिओत रेकॉर्डिंग केले त्या जागेचं नुकसान झालं आहे. त्यांनाही नुकसाना भरपाईची रक्कम दिली पाहिजे, हे जे भकंड, भामटे आणि गद्दार लोक आहेत ज्यांनी तोडफोड केली, ज्यांना शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा चालतो पण गद्दारांचा अपमान केल्याचे चालत नाही त्यांच्याकडून दाम दुपटीने नुकसान भरपाईची रक्कम वसूल करावी अशी मागणी केली.
आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विधानभवन, मुंबई येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. pic.twitter.com/cS3e6Yr5xc
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 24, 2025
Marathi e-Batmya