मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आदी भागात करोना व्हायरसने प्रभावित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसेच या आजाराची लागण विधिमंडळाच्या सदस्यांना होवू नये याकरीता विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या शनिवारी संपविण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी …
Read More »मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा
मुंबईः विशेष प्रतिनिधी १९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा …
Read More »अबु आझमी म्हणाले, एक महिना द्या सगळं बंद करून दाखवतो राज्य सरकारला आव्हान मादक द्रव्ये बंद करा अन्यथा
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील अनेक भागात नशेली पदार्थ मिळत आहेत. अशा पध्दतीच्या पदार्थांची विक्री बंद करणे राज्य सरकारच्या हातून होणार नसेल तर माझ्या हातात द्या एक महिन्यात अशा गोष्टी बंद करून दाखवतो असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज्य सरकारला दिले. या आव्हानाची तात्काळ दखल घेत विधानसभाध्यक्ष पटोले …
Read More »मंत्री आणि विरोधी पक्षनेते तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमलाय का? विधासभा अध्यक्ष नाना पटोलेंची भर सभागृहातच विचारणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रश्नोत्तरे सुरु झाली. त्यामुळे अखेर सभागृहात अध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन तुम्ही दोघांनीच दुसरा अध्यक्ष नेमलाय का? अशी मिश्किल विचारणा करत …
Read More »आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे नाही, मग मुख्य सचिवांना माफीची शिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर एकवेळ संधी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभा सदस्यांकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करण्यात येतात. मात्र संबधित विभागाकडून महिना उलटून गेला तरी त्यावर उत्तर दिले जात नसल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी विधानसभेच्या दरवाज्यात उभे राहून सभागृहाची माफी मागावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …
Read More »शिवछत्रपतींच्या स्वराज्याची मराठी केविलवाणी नाहीच “इये मराठीचिये नगरी” कार्यक्रमातून विधानमंडळात “मराठीचा गजर”
मुंबई: प्रतिनिधी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वास व्यक्त केला. राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने …
Read More »ओबीसींची संख्या कळण्यासाठी जणगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवा राज्य विधिमंडळाची केंद्राला शिफारस
मुंबईः प्रतिनिधी देशासह राज्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरीकांच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व फायदे देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याधर्तीवर ओबीसी प्रवर्गातील नागरीकांनाही निधी देण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. तेव्हा त्यांच्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र ओबीसी नागरीकांची निश्चित अशी आकडेवारी नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रखाना …
Read More »स्वा. सावरकरांचा विषय रेकॉर्डवर नको म्हणताच भाजपाचा गोंधळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली हरकत
नागपूरः प्रतिनिधी विधानसभेत कलम २३ आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चर्चेस सुरुवात केली. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही असे सांगताच भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाच सभागृहाचे …
Read More »टिसच्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी टाटा इन्स्टि्यूट ऑफ सोशल सायन्स, (टिस) यांच्याकडून गोवारी समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासाचे काम सूरु असून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर शासन स्तरावर त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. विधानसभा अध्यक्ष यांना प्राप्त झालेल्या गोवारी समाजाच्या निवेदनानंतर या संदर्भात …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनविणार महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या …
Read More »
Marathi e-Batmya