Tag Archives: narendra modi

पन्नास वर्षे सत्तेत राहण्याची दर्पोक्ती करणारा भाजप पराभवाच्या भीतीने ग्रासलेला! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी २०१४ च्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ विजय मिळवत गेलेल्या भाजपला आता लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सभांना मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष जनतेला पाच वर्षातच नकोसा झाल्याचे चित्र दिसत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी …

Read More »

पद्मविभूषण देणारेच विचारतायत पवारांनी काय केले खा.सुप्रिया सुळे यांचा भाजपावर पलटवार

दौंडः प्रतिनिधी शरद पवार साहेबांना पद्मविभुषण ही पदवी तुमच्या सरकारने दिली आहे ना ? मग ५० वर्ष शरद पवारसाहेबांनी काय केले कसं विचारता, त्यांनी काम केले नाही तर मग त्यांना ही महत्त्वाची पदवी का दिलात असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मोदी सरकारला केला. सध्या सत्तेत असलेल्या लोकांमध्ये पोरांना …

Read More »

मोदी नावाचा माणुस काय करेल माहित नाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भीती

बारामती – दौंडः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो असे सांगतात. परंतु मला भयंकर काळजी वाटू लागली असून हा माणुस काय करेल माहित नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे आज सकाळी ११ वाजता …

Read More »

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींचे मारेकरीही भाजपचे उमेदवार दिसतील ...तर नथुराम गोडसेही भाजपाचा उमेदवार असता! : काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचे भाजपाकडून होणारे समर्थन पाहता, नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असती, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. प्रज्ञा ठाकूरवर दहशतवादाचे गंभीर आरोप आहेत. सध्या ती केवळ जामीनावर सुटलेली आहे. …

Read More »

निवडणूकीतील पराभव टाळण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंहांच्या त्या वक्तव्याशी भाजपची फारकत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य वैयक्तिक असून भाजपा त्या वक्तव्याशी सहमत नाही. त्यांना अटक केली त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते व त्यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जे पोलीस अधिकारी – कर्मचारी व नागरिक मरण पावले ते सर्व हुतात्मे आहेत असे आमचे मत असून आम्हाला शहिदांबद्दल आदर असल्याची भूमिका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी स्पष्ट करत साध्वी प्रज्ञा सिंह …

Read More »

भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा आणि बेगडी देशप्रेमाचा पर्दाफाश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

मुंबई : प्रतिनिधी दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल करून जराही लाज …

Read More »

मोदींचे कार्टून, मोदी, मल्ल्या यांच्या छायाचित्रांमुळे प्रचार फिल्मला परवानगी नाकारली ! निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा अन्यथा प्रचार थांबवणार: आव्हाड यांचा इशारा

ठाणे : प्रतिनिधी नरेंद्र मोदीसारखे कार्टून दिसते, निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे छायाचित्र असल्याने मिडिया सेंटरचे सेक्रेटरी मिलिंद दुसाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार फिल्मला परवानगी नाकारण्याची माहिती धक्कादायक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याप्रश्नी २४ तासात हस्तक्षेप करावा अशी मागणी करत न्याय द्यावा अन्यथा निवडणूकीचा प्रचार थांबवू …

Read More »

मोदींच्या सत्तेबाबत शंका असल्यानेच मोहिते-पाटील, विखेंनी भाजप प्रवेश टाळला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यावर विजयसिंह मोहिते पाटील व राधाकृष्ण विखेपाटील यांनी भाजपमध्ये जाणं टाळलं असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. आज अकलूज येथे मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले. परंतु त्यांनी भाजप प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण …

Read More »

…तर मग नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल ! विनोद तावडेंच्या आरोपाला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्ष खोटं बोलून …

Read More »

मोहिते-पाटलांच्या भाजप आगमनासाठी पंतप्रधान मोदींची सभा? अकलूजच्या सभेची जोरदार तयारी

मुंबई : प्रतिनिधी मुलगा रणजितसिंह याच्या पाठोपाठ वडील विजयसिंह मोहिते-पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा संबध राज्यात सुरु आहे. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथे होत असून या सभेत मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. येत्या २३ तारखेला माढा मतदार संघात मतदान होणार आहे. …

Read More »