विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जर गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता अशी टीका केली. त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीला हसिना पारकर हिला पैसे दिले, तो मंत्री तुरुंगात …
Read More »अजित पवारांनी साधला अप्रत्यक्ष विधानसभाध्यक्षांवर निशाणा, नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले… शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप
विधिमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहात केला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बऱ्याचवेळा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक झुकते माफ देण्यात येत …
Read More »छगन भुजबळांचा सवाल, निकष पूर्ण केले तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच तासात छगन भुजबळांनी धरले धारेवर
मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच …
Read More »अजित पवार यांची उपरोधिक टीका,…जर आम्ही गेलो असतो तर तो महाराष्ट्र द्रोह ठरला असता हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे... कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे
पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल करतानाच अशा …
Read More »अजित पवारांचा आरोप, ४ महिन्यात वर्षावरील चहापाणावर २ कोटींचा खर्च, चहामध्ये सोन्याचा अर्क ? शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची बैठक विधानभवनात आज झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका करताना सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात असल्याचा आरोप करत ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा …
Read More »नारायण राणेंचा अजित पवारांना बारा वाजविण्याचा इशारा देत ठाकरेंच्या खोक्याची कॅसेट माझ्याकडे कसबा निवडणूकीवरून राणेंचा अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर …
Read More »अजित दादांच्या त्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचा पलटवार, सकाळी शपथ तर संध्याकाळी कोणा… शेवटी जनता हुशार
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली असून या निवडणूकीचा प्रचार संपताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबाबत भविष्यवाणी करत …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवरून अजित पवारांची टीका, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणूकीत फिराव लागतंय.. कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा- शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता
पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …
Read More »शरद पवार यांची भाजपावर टीका, मी इतकी वर्षे भाजपावाल्यांना बघतोय पण त्यांची विधाने पोरकट एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न...
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. युवा वर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली, त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोघांशी संवाद साधल्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya