मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रति महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी करण्यात आले आहे. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्रो ८ वाजेपर्यत धान्य वाटण्याचे आदेश सर्व रेशनिंग अर्थात रास्तभाव …
Read More »पंतप्रधान म्हणाले, स्वरूप कसे असेल माहित नाही मात्र तयारीत रहा डॉक्टर, नर्सेस, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण करेल ते सांगता येणार नाही. त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. …
Read More »३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन : जनतेने खबरदारी घ्यावी आम्ही जबाबदारी घेवू १५ दिवसांनी वाढणार असल्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरु ठेवण्याची भूमिका राज्याच्यावतीने मांडण्यात आली. त्यामुळे या आजाराची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडण्यासाठी राज्यातील जनतेने खबरदारी आम्ही जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर …
Read More »नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …
Read More »काँग्रेस अध्यक्षा पंतप्रधानांना म्हणाल्या, आम्ही सोबत पण हे सल्ले अंमलात आणा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षिय नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधानांनी काय करावे याबाबतचे पाच कलमी सल्ले देत त्याची अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोबत असल्याची …
Read More »पंतप्रधान मोदींनी मराठा महासंघाच्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत जनतेचा अपमान करत असल्याचा खेडेकर यांचा आरोप
मुंबई-चिखली: प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील राज्य सरकारांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेवून जनतेचा अपमान करत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनी करत त्यांना जाहीररित्या प्रश्न विचारून याची उत्तरे …
Read More »परिस्थिती पाहूनच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा मुख्यमंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांची सूचना
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचनेची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ अंमलबजावणी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकी दरम्यान आवाहन
मुंबई: प्रतिनिधी सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाणे गरजेचे असून तसे आवाहन सर्व धर्मगुरूंना करणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. या सूचनेची तात्काळ दखल घेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यानुसार सर्व …
Read More »पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …
Read More »चला आर्थिक हातभार लावू या कोरोना विरोधी लढ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19, पीएम केअरस् खात्यात जमा करू या निधी
मुंबई : प्रतिनिधी कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा …
Read More »
Marathi e-Batmya