नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी आज बोलविल्यानंतर संपूर्ण देशभरात काँग्रेसकडून मुंबई आणि नागपूरातील ईडी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा कसा झाला याची माहिती देण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून …
Read More »राहुल गांधींची ईडी चौकशीः केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे ! : नाना पटोले
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु …
Read More »घराणेशाहीवरून काँग्रेसने दाखविला पंतप्रधान मोदी यांना आरसा मोदींना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून देत दाखविला आरसा
२०१४ सालापासून काँग्रेसवर घराणेशाहीवरून गांधी घराण्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र यावेळी काँग्रेसने एका वृत्ताचा हवाला देत भाजपामधील २५ टक्के उमेदवार हे कसे घराणेशाहीतून आल्याचा आरसा दाखवित त्या घराणेशाहीबाबतचे उत्तर द्या अशी मागणीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका ट्विटद्वारे …
Read More »सोनिया गांधीना आलेल्या ईडी नोटीसीवर मंत्री थोरात म्हणाले, राजकीय संस्थेप्रमाणे… संपूर्ण देशातील जनता सोनिया व राहुल गांधी यांच्या पाठीशी
देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे …
Read More »अखेर प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला नकारच, ट्विट करत दिले “हे” कारण काँग्रेसकडून ट्विट करत दिली माहिती
मागील काही दिवसांपासून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली. मात्र आज अखेर प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेससोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांनी प्रदीर्घ …
Read More »काँग्रेसच्या बैठकीत झाला “हा” निर्णय: मात्र जी २३ नेत्यांनी केली ही मागणी चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत निर्णय
देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक बोलाविली. जवळपास चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत पुन्हा एकदा प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसने विश्वास दाखविला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुढील वाटचाल करणार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी …
Read More »निकालानंतर सोनिया गांधींनी बोलावली बैठक तर राहुल गांधीं म्हणाले… पंजाबमधील दारूण पराभमामुळे काँग्रेस गारठली
विधानसभा निवडणूकीला अवघे सात-आठ महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीने तोंड वर काढले. या दुफळीला शांत करता करता काँग्रेसच्या नेत्यांना नाकीनऊ आले. परंतु अखेर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर दुसऱ्याबाजूला ऐन निवडणूकीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्यावरील उपचाराचा खर्च काँग्रेस करेल राहुल गांधींबद्दल हेमंत बिस्वा शर्मांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध
मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज …
Read More »पंतप्रधान मोदींचा सलग २ऱ्या दिवशी काँग्रेसवर हल्ला, “…तर हे झालं नसतं” राज्यसभेतील चर्चेला मोदींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा …
Read More »“महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार” मोदींच्या वक्तव्याने भाजपा पराभवाच्या छायेत की उत्तरच नाही? मोदींची भाषणात परस्पर विधाने
मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरु झालेली असताना यातील पाचही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये भाजपा मूळ मुद्यावरून भरकटत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेसला जनताच नाकारत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतानाच दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाच्या प्रसारास …
Read More »
Marathi e-Batmya