विधानसभेत गाजलेला उंदीर घोटाळ्यातील मंत्रालयातील सार्वजनिक विभागातील शाखा अभियंता कु. रेश्मा चव्हाण यांच्यासाठी बांधकाम मंत्र्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्याकडे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी आमदार निवास उपविभागाच्या अतिरिक्त कार्यभार सोपवल्याची गंभीर तक्रार विधानसभेतील शिवसेनेचे विधीमंडळ मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याने त्यांची मंत्री …
Read More »मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, दादा, कार्यकर्ते ठेकेदारांसाठी सर्वपक्षिय बैठक घ्यावी लागेल अजित पवार यांना उद्देशून वक्तव्य करत नवे पोर्टल बनविणार असल्याची माहिती
विधानसभेचे नियोजित कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी भिवंडी-पालघर दरम्यानच्या खराब रस्त्याचा प्रश्न भाजपाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र रस्त्याची कामे देताना कार्यकर्त्ये ठेकेदार आणि मोठ्या कंत्राटदारांना कशी दिली जातात याची एकप्रकारे गौप्यस्फोटच भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला. यावेळी भिवंडी-पालघर रस्त्याचा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान
राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण …
Read More »रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …
Read More »सर्व वैद्यकिय सुविधा युक्त टेलिमेडिसिन केंद्राचे लवकरच उद्घाटन
राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स …
Read More »आनंदाचा शिधाचे वितरण आता ऑफलाईन पध्दतीने अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ …
Read More »सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार, फक्त दोन दिवस शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार-अन्न व नागरी मंत्री रविंद्र चव्हाण
राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी हेच आमचे ध्येय आहे. १९ व २० …
Read More »सार्वजनिक बांधकाम विभागातील भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. …
Read More »मंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्या सहसचिवावर कारवाई मंत्री रवींद्र चव्हाण यांचा जोरदार झटका
मंत्री आणि मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विभागाच्या सहसचिवाला जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच मंत्री कार्यालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणा-या या अधिका-याची तातडीने चौकशी करुन …
Read More »बेकायदा गँस वितरणप्रकरणी ९ एजन्सींच्या विरोधात गुन्हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी घरगुती गँस पुरवठा करणाऱ्या नळपाईप लाईनमधून अनधिकृतरित्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री केल्याप्रकरणी शहरातील ९ गँस एजन्सींच्या विरोधात जीवनाश्वक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहर व उपनगरात घरगुती गँस सिलेंडरच्या अवैध विक्री करणाऱ्या गँस …
Read More »
Marathi e-Batmya