Tag Archives: rto

मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरू परिवहन विभागाकडून प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यामुळे या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांकरीता आरक्षीत करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहीत …

Read More »

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क स्थगित आरटीओची प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन परिवहन आयुक्त …

Read More »

शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी व …

Read More »

आरटीओने फक्त “चॉईस” वर कमावले ४१ लाख रूपये

नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयाच्या एमएच ०३ ईएल …

Read More »

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी

आरटीओ अर्थात परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता व्हॉट्सॲपवर तक्रार आरटीओने जारी केला व्हॉट्सअॅप नंबर आणि ई-मेल आयडी

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. या कारवाई अंतर्गत ३१ जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण १५४ …

Read More »

४ हजार २७७ खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई ; १ कोटी ८३ लक्ष रूपयांची वसूली राज्य परिवहन कार्यालयाची कारवाई

राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार २७७ खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत १ कोटी ८३ लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला …

Read More »

आरटीओत नव नियुक्त होत असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिले नियुक्ती पत्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा …

Read More »

मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाहनचालकांसाठी या ७ नवीन सेवांचे लोकार्पण राज्य रस्ता सुरक्षा अभियान उद्घाटन

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन …

Read More »

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती

नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …

Read More »