भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा …
Read More »सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये
मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मिठी नदीच्या निविदा प्रक्रियेत सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन तीन वर्षे मनपाचा हेतू वाईट होता का? मनपाचे स्पष्टीकरण म्हणजे घोळ असल्याची मान्यता
मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदी स्वच्छतेसाठी काढल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेवरील आरोपांवर मुंबई महानगरपालिकेने माध्यमांना दिलेले स्पष्टीकरण हे या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची मान्यता असून या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.
काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, फडणवीस सरकारमध्ये परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क बंगळुरूला चालल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सत्यच
थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात अधिक आली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे य़ेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन …
Read More »सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली
मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत दाखवा स्वप्नांचे व्यापारी देवेंद्र फडणवीस- दुबई सारखे शहर बनवण्याआधी १०० स्मार्ट सिटी कुठे आहेत ते दाखवा
काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी म्हणाले की दोन वर्षांमध्ये भारतात अमेरिकेसारखे रस्ते होतील. आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी म्हणतात की एमएमआर मध्ये दुबई पेक्षा मोठे सुंदर शहर वसवू. भाजपा नेत्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ९०% …
Read More »सचिन सावंत यांची राज्य सरकारवर टीका, मनोरंजक निर्णय पशुवाहतूकी विरूद्ध फक्त पोलिसच कारवाई करू शकतात, नागरिक तक्रार करू शकतात
कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे बेकायदेशीर पशुवाहतूकीविरुध्द केवळ पोलिसच कारवाई करु शकतात. दुसरीकडे नागरिक तक्रार करु शकतात असेही म्हणतात. याचा अर्थ वाहतूक थांबवण्याचा किंवा तक्रारी व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करु शकणार नाहीत. पण पोलिसांव्यतिरिक्त जर कोणी व्यक्ती किंवा संस्था तक्रारी व्यतिरिक्त इतर …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदांची चौकशी करा मुंबई महापालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्प निविदा प्रक्रिया म्हणजे भ्रष्टाचाराचा महाघोटाळा
मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भीषण भ्रष्टाचार घडत असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. विशेषतः भांडुप कॉम्प्लेक्स (२००० MLD) व पांजापूर (९१० MLD) जलशुद्धीकरण प्रकल्पांसंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे– मंत्रालय आणि मनपा कार्यालये? सचिन …
Read More »
Marathi e-Batmya