राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील …
Read More »पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात : एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणा सज्ज नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पूर्व विदर्भातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे …
Read More »राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क
अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० …
Read More »महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक १४२० कोटी रुपयांचा निधी वितरित निधीसाठी मार्गदर्शक तत्वे शिथिल, तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
राज्यातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ तसेच पावसाळ्यातील नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७ हजार ५३२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी अर्थ मंत्रालयाकडून वितरित करण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ८१२ कोटी रुपये, तर ओडिशा …
Read More »एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …
Read More »मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश
मुंबई: प्रतिनिधी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी …
Read More »रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश
मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …
Read More »पुण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचावकार्य सुरु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलीस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन …
Read More »
Marathi e-Batmya