शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी …
Read More »संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याने लगावला टोला, ते अंतरयामी झाले का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हलविण्याची पडद्यामागे हालचालीच्या वक्तव्यावर लगावला टोला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित असलेले जनमत निर्माण करण्यात शिंदे हे कमी पडत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या त्या गौप्यस्फोटावर खोचक …
Read More »तळीरामांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी महसूल यंदाच्या वर्षी २१ हजार कोटींचा महसूल मिळाला
राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७,५०० कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन २०२२-२३ या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने २१,५०० कोटी रुपये …
Read More »शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा, अवैध दारू दुकानांवर आता ड्रोन मार्फत नजर अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणणार
राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले. मंत्री देसाई …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची नोकरभरती पाच महिन्यात पूर्ण करणार ६६७ पदे लवकरच भरणार- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न …
Read More »मंत्री शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, मॉर्फींग व्हिडिओप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सर्वपक्षियांच्या मागणीवर शिंदे-फडणवीस सरकारचा तात्काळ निर्णय
दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सदरचा व्हिडिओ हा मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी करत यामागे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा आरोपही केला. त्यानंतर या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आज सकाळी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव, …
Read More »भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …
Read More »दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार अनेकवेळा गंमतीने बोलत असतात… तर शंभराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माग घेतील अनं समजही देतील
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन लक्ष्य केले. तसेच महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला …
Read More »बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन
बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे, खते यांचे गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी …
Read More »चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती
नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …
Read More »
Marathi e-Batmya