Breaking News

Tag Archives: share market

शेअर्स मार्केटमध्ये महिन्यात कमावला ९०० कोटींचा नफा, माहित आहे का? कोण अवघ्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाला यांनी कमावले ९०० कोटी कमावले

मुंबई: प्रतिनिधी भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना दोन कंपन्यांच्या शेअर्समधून तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई अवघ्या एका महिन्यात झाली आहे. टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ९०० कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या एका महिन्यात …

Read More »

अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस मात्र शेअर बाजार कोसळलाच एलआयसी आणि आयडीबीआय समभाग विक्रीच्या घोषणेचा परिणाम

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी देशाच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर त्याचे अत्यंत प्रतिकूल पडसाद शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अर्थात निर्देशांक तब्बल ९८८ अंकांनी कोसळला. तर विमा क्षेत्रातील कंपन्यांसह वाहन उद्योग, पायाभूत सुविधा व धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने शेअर्सचे भाव गडगडले. …

Read More »

आणि ऐन अर्थसंकल्पातच शेअर बाजार कोसळला शेअर्स नफ्यावर द्यावा लागणार कर

मुंबईः प्रतिनिधी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशातील शेअर बाजार चांगलाच वधारला होता. मात्र, अर्थसंकल्पात दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स) आकारण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली. सेन्सेक्स ३५ हजार ५२६ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टीही १० हजार ९२१ पर्य़ंत घसरला. दुपारनंतर …

Read More »

विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात …

Read More »

सेन्सेक्स ३६ तर निफ्टी ११ हजारांच्या वर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

मुंबई: प्रतिनिधी देशातील शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी असून सेन्सेक्स, निफ्टी रोज नवीन विक्रम करत आहे. मंगळवारी सेन्सेक्सने प्रथमच ३६ हजारांचा टप्पा ओलांडून आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीही प्रथमच ११ हजारांच्या वर गेला आहे. परकीय आणि देशातील गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराने विक्रम केला आहे. सेन्सेक्स …

Read More »

यंदाही आयपीओ करणार मालामाल ५० पेक्षा अधिक कंपन्या आयपीओ आणणार

मुंबई : नवनाथ भोसले  वर्ष २०१७ मध्ये भारतीय शेअर बाजारांनी २८ टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अनेक शेअर्सनी चांगला परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले.  प्राथमिक समभाग विक्रीसाठीही मागील वर्ष चांगले गेले. या वर्षात ३८ कंपन्यांनी आयपीओमार्फत शेअर बाजारातून ७५ हजार ४७५ कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओमधूनही गुंतवणूकदारांना चांगला लाभ झाला …

Read More »

निफ्टी प्रथमच १० हजार ७०० च्या वर विक्रमी पातळी ओलांडली

मुंबईः प्रतिनिधी नवीन वर्षात देशातील शेअऱ बाजार रोज नवीन विक्रम बनवत आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोमवारी शेअर बाजार पूर्ण दिवस उच्चांकी पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दिवसाच्या अखेरीसही विक्रमी पातळीवर बाजार बंद होत निफ्टीने प्रथमच १० हजार ७०० च्या वर बंद झाला. तर सेन्सेक्सही २५१ अंकांनी वाढून ३४ …

Read More »