भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपात येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर येण्याबाबत काही संकेत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा उपरोधिक टोला, जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले धास्ती घेतली की नाही माहित नाही पण कामाला लागले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः …
Read More »सुषमा अंधारेंच्या ट्विटवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण सिनेमात
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि मविआच्या इतर कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात मोर्चा काढला. यावेळी भाषणात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. त्यावरून आता भाजपा …
Read More »संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा,…तर ते खरे गृहमंत्री शोभतील काडतूस असाल तर भ्रष्टाचाऱ्यांवर वापर करा
काडतूस असतील तर त्यांनी त्याचा वापर भ्रष्टाचाऱ्यांच्या करावा. तर ते खरे गृहमंत्री शोभतील. पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर बसवून विरोधकांवर काडतूस फेकून मारत आहेत. पण ती भिजलेली काडतूस आहेत. त्यामुळे काही होत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून सातत्याने गैरवापर …
Read More »पुण्यातील उद्धव ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश हर्षवर्धन पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश
उद्धव ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, नीरा बाजार समितीचे संचालक भानुकाका जगताप यांच्यासह पुणे जिल्ह्यातील उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय …
Read More »सुषमा अंधारे यांचा बावनकुळेंना सवाल, इतकी ताकद, ऐपत…मग फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं? ४८ तासात मातोश्रीवर या आम्ही तुमचं स्वागत करू
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा दाखल केला नाही, यावरून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. …
Read More »नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका, ‘मोले घातले रडाया…’ ओळीतून फटकारत महाफडतूस माणूस तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे
अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत फडतूस कोण?, तर नागपूरात पुष्पा स्टाईल …मै कारतूस है उध्दव ठाकरे यांच्या टीकेला दिले उत्तर
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे आव्हान दिले. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी ४ एप्रिल …
Read More »उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, कोणी तरी फडणवीसी करणारा फडतूस माणूस… घरावर काही आलं की एसआयटी अन् मिधे गटाच्या हल्ल्यावर फडणवीसी दाखविण्याच हिम्मत नाही
ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे …
Read More »उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, मुख्यमंत्री म्हणण्याऐवजी गुंडमंत्री म्हणा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन घेतली सपत्नीक भेट
ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना समाज माध्यमावरील एका पोस्टवरून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची आज रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya