Tag Archives: shivsena

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं …

Read More »

सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला म्हणाले, धनुष्यबाण विषयीचा निर्णय आम्ही घेऊ उध्दव ठाकरेंना दिलासा; निवडणूक आयोगाला फटकारले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यास आता १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. शिंदें गटाकडून आता शिवसेनेवर दावा करण्यात येत असताना आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाकडून …

Read More »

हिंदूत्वासाठी बाहेर पडलेल्या मंत्र्यांची खाते वाटपानंतर अवस्था “आगीतून उठून फुफाट्यात”? खाते वाटपावरून धुसफूस

हिंदूत्वाचे कारण पुढे करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात सेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या ४० आमदारांपैकी ९ जणांना नुकतेच मंत्री पदाची लॉटरी लागत खात्यांचे वाटप झाले. मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असताना जी खाती होती. त्यापेक्षा कमी दर्जाची तर काही जणांना तीच खाती पुन्हा मिळाल्याने या हिंदूत्वादी …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारावरून उध्दव ठाकरे म्हणाले, आपण पुन्हा गुलामगिरीत… राज्य सरकार आहे कुठे शेतकरी बेहाल

आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. त्यापूर्वी १५० वर्षे ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात होतो. त्यावेळी आपण गुलामगिरीत होतो. पण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, यांची बावन असतील नाहीतर एकशेबावण पण शिवसेनेला… हर घर तिरंगा म्हणे पण घर नाही त्याने काय करायचे

शिवसेना कोणाची? आणि अपात्रतेच्या मुद्यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी जाहिरपणे बोलण्याचे टाळले होते. यापार्श्वभूमीवर मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र …

Read More »

बंडखोर संजय शिरसाट यांची सारवासारव, मोबाईलची तांत्रिक चुक उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आधी पोस्ट नंतर डिलीट

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदारांनी उठाव केला. यापैकी एक असलेले औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी काल रात्री अचानक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचा विधानसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटद्वारे शेअर केला. त्यामुळे शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज …

Read More »

राऊत कोठडीत गेल्यानंतर सर्वानाच एक प्रश्न, ईडी कोठडीत काय करत असतील? नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या मिटींगा

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऐरवी त्यांचा दिवस राजकिय घडामोडी आणि वक्तव्यात जातो. मात्र संजय राऊत यांना तुरूंगात गेल्यानंतर त्यांचा दिवस कसा जात असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आपच्या मराठी ई-बातम्या.कॉमच्या प्रतिनिधीने याविषयीचा कानोसा घेतला असता संजय राऊत …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …

Read More »

मंत्री संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा, तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राठोड यांचा इशारा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश करताच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या …

Read More »

उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे वादात सर्वोच्च न्यायालयाची पुन्हा तारीख १२ ऑगस्टची सुनावणी आता २२ ऑगस्टला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण रोवल्यामुळे सांसदीय राजकारणात आणि कायद्यातील तरतूंदीबाबत काही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या राजकिय लढाईवर लवकर निकाल लागून कायद्यातील तरतूंदीचा नव्याने अर्थ आणि सासंदीय राजकारणात निर्माण झालेला पेच याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना …

Read More »