यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल! असे नि: संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य व परिवहन …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात यश
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त …
Read More »एसटी महामंडळ कृती समितीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक उच्चाधिकार समितीने बैठक घेऊन आठवडाभरात अहवाल सादर करावा
राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक …
Read More »जयंत पाटील म्हणाले, सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे आता स्पष्ट
ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यावेळी १०५ एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार …
Read More »गोपीचंद पडळकर यांचे परिवहन मंत्री परब यांना पत्र, तर उद्रेक होणार नाही… कोविड काळातील कामाचा एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन भत्ता नाहीच
कोविडच्या पहिल्या लाटे दरम्यान संपूर्ण देश आणि देशातील कामकाज ठप्प होते. त्यावेळी राज्य सरकारच्या विविध कामकाजासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांच्याकडून विशेष सेवा बजावून घेण्यात आली. त्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनीही विशेषतः ड्रायव्हरनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावली. या सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या सेवेबद्दल प्रोत्साहन …
Read More »सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जामीन मिळण्याची शक्यता
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास्थानावर केलेल्या आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. …
Read More »अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती
संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल …
Read More »शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्य व देशभर पडसाद राष्ट्रवादीने केले काळयापट्टया बांधून मूक आंदोलन...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून आज राज्यभर आणि गोवा राज्यात काळयापट्टया बांधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी, युवक, युवती व महिला यांनी मूक आंदोलन केले. शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने भ्याड हल्ला केला त्यानंतर राज्यभर तणावाचे …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे प्रतिष्ठीत नेते, आमचं सरकार लक्ष देईल मुख्यमंत्री प्रकरण हाताळत आहेत
काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वर हल्ला करत आंदोलन केले. या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यात न्यायालयानेही सदावर्तेंना दोन दिवस पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या …
Read More »फडणवीसांचा सवाल, माध्यमे पोहोचली मग पोलिस का उशीरा पोहोचले? तेव्हा पोलिस काय करत होते
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्ला करत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध करत कोणत्याही नेत्यांच्या घरावर जावून अशा पध्दतीचे आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मतही ट्विट करत व्यक्त केले होते. मात्र आज …
Read More »
Marathi e-Batmya