राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य …
Read More »महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात
राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …
Read More »मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच संरक्षित कांदळवन (मॅग्रोव्ह) क्षेत्राला लागून असलेला भराव आणि कत्तल थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी निष्कासन मोहीम राबवून २८० पेक्षा जास्त अतिक्रमण हटवून सुमारे १०००० चौ.मी. एवढी शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहिम यशस्वीरित्या पार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सरकारचा एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागासमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. यामुळे राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!
कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे, त्यात संवदेना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारुन वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील काय? असा सवाल शिवसेना …
Read More »स्टुडिओत १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस गोळीबरात मृत्यू पवई भागात रोहित आर्य नावाच्या एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवले
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येते होते. उपचारा दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर …
Read More »७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. ८) पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना …
Read More »पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …
Read More »दारूची दुकाने परमिटबार आदी सोडून सर्व दुकाने २४ तास खुली राहणार राज्य सरकारकडून नवा शासन निर्णय जारी
तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयानुसार मुंबईतील नाईट लाईफ सुरू ठेवण्यासाठी नव्या कायद्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी नव्या नियमानुसार २४ तास दुकाने खुली ठेवण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि हा नियम नव्या महायुतीच्या सरकारने कचऱ्याच्या डब्यात टाकला गेला. परंतु आता …
Read More »शरद पवार यांची चिंता, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उधवस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, असे आवाहन …
Read More »
Marathi e-Batmya