Tag Archives: state government

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन जारी जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात  असल्याने नागरिकांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

Read More »

सोलापूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला स्वतःची जागाच मिळेना २०२० पासून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाहण्यासाठी वेळच नाही

राज्यातील गुन्ह्यांचा तपास अतिजलद पद्धतीने करता यावा यासाठी राज्य सरकारने जवळपास विभागातीय आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर न्याय वैद्यक प्रयोगशाळा उभारण्याचे धोरण तयार केले. त्याअंतर्गत न्यायवैद्यक प्रयोगशाळा तयार करण्याचे धोरणही तयार केले. त्यानुसार सोलापूरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना राज्य सरकारनेही केली. मात्र या भाड्याच्या जागेत असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकरीता स्वतःची जागा असावी याकरिता …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार

मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. …

Read More »

शासकीय जागेवर जाहिरात फलकांसाठी ई-लिलाव महसूल वाढीसाठी शासनाचा निर्णय

राज्यातील शासनाच्या जागांवर जाहिरात फलक लावण्यासाठी ई- लिलाव प्रक्रिया राबविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. पाच वर्षासाठी या जागा वापरासाठी दिल्या जातील. प्रति निविदा प्रक्रिया पाच हजार रुपयांचे शुल्क याकरिता आकारले जाईल. तर महापालिका क्षेत्रातील जमिनीच्या बाजारभावानुसार ३ पट तर जिल्हा किंवा राष्ट्रीय महामार्गाकरिता ५ पट दर आकारला जाणार आहे. महसूल …

Read More »

सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.

काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …

Read More »

टाटा टेक्नॉलॉजी आणि शासन यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंज्यस करार दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा

टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी …

Read More »

राज्य सरकार घेणार हुडकोकडून दोन हजार कोटी रूपयांचे कर्ज छत्रपती संभाजीनगरला ८२२, नागपूर २३८, मीरा भाईंदरसाठी ११६ कोटी मिळणार

नागरी  पायाभूत  सुविधा  विकास कर्ज योजना  अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वहिश्याचा निधी उभारण्याकरिता  हुडको  कडून  २००० कोटी  रुपयांचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे छत्रपती  संभाजीनगर महानगर  पालिकेच्या  पाणी पुरवठा प्रकल्पासाठी  ८२२ कोटी २२ लाख  …

Read More »

त्रिभाषा धोरण निश्चितीः डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत या सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून सदस्यांचीही केली नियुक्ती

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, …

Read More »

राज्यातील ९३.५१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ९३.५१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन …

Read More »