Tag Archives: uddhav thackeray

उध्दव ठाकरे यांचा निर्धार, माझ्यावर दबाव असला तरी मातोश्रीवर आरोप करणाऱ्यांबरोबर बसणार नाही मी शांत आहे षंड नाही...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशी आज ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना उध्दव …

Read More »

शिवसेनेतील बंडखोरीवरून शरद पवार यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही

शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. यावरून काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा आणि दिलेल्या आर्थिक पाठबऴावरून भाजपावर निशाणा साधला. तसेच राष्ट्रीय पक्षांच्या नावांची यादी वाचून दाखवित सहा राष्ट्रीय पक्षांपैकी कोणत्या राजकिय पक्षाकडे …

Read More »

विधिमंडळाचा पहिला निर्णय, उध्दव ठाकरे गटाचा पहिल्या फेरीत विजय एकनाथ शिंदेंच्या 'त्या' पत्राला मान्यता नाही

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत स्वतःचा गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत जमविल्याचा दावा केला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करत शिंदे यांच्या ठिकाणी मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली. एकाबाजूला …

Read More »

शिवसेनेची बंडखोर आमदारांवर कारवाई तर एकनाथ शिंदे म्हणाले, घाबरू शकत नाही एकनाथ शिंदेचे शिवसेनेला प्रत्युत्तर

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर आता शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने विधिमंडळाशी पत्र व्यवहार सुरु केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून समेट घडवून आण्याचे प्रयत्न सुरु केलेले असतानाही या बंडखोर …

Read More »

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो कायद्यातील तरतूदीवर ठेवले बोट

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता विधिमंडळात आपलीच खरी शिवसेना म्हणून ओळख निर्माण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्षांसोबत पत्र व्यवहार सुरु केला आहे. एकाबाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून विधिमंडळात आपलीच शिवसेना खरी असल्यासाठी प्रयत्न …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आम्ही बोलूच, पण ती माहिती जरा पुढे येवू द्या बंडखोर आमदारांना दिलेल्या सोयी-सुविधांवरून जयंत पाटील यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा

शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने पहिल्यांदा सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे गेले आणि तेथून बंडाचा झेंडा रोवला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, या सर्वामागे कोण आहे याबद्दल आम्ही बोलूच पण त्या आमदारांना कोणी विमान सेवा पुरविली, त्यांची पंचताराकींत हॉटेलमध्ये …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संवाद झाल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया… शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबध नाही

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात ऑनलाईन पध्दतीने राज्यातील जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत भाष्य केले. त्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, हे …

Read More »

परतलेले शिवसेना आमदार म्हणाले, आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल गेलेल्यांना परत येण्याची केली विनंती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्यानंतर शिवसेनामधील अनेक आमदार आणि अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांची पाठीमागे गेले. मात्र या आमदारांमधील एक आमदार आणि सूरत येथील रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलेले आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून परत माघारी फिरले असून ते …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात अस्थिर वातावरणात असतानाही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला काही मंत्री हजर होते. तर काही मंत्री गैरहजर होते. मात्र तरीही आज झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे. वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या …

Read More »

शिवसेनेचे प्रतोद प्रभू यांचा आमदारांना इशारा, तर एकनाथ शिंदे यांच्याकडून उचलबांगडी शिंदे गटाकडून शिवसेनेचा नवा प्रतोद भरत गोगावले

शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात आता खऱ्या अर्थाने संसदीय लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित केल्याचे आदेश जारी करत अन्यथा कारवाईचा इशारा दिला. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ …

Read More »