Breaking News

Tag Archives: unseasonal rain

जानेवारी ते मे २०२४ मधील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपास मंजूरी ५९६ कोटी रुपये वाटप होणार- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे …

Read More »

मुंबई ठाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसः मोठे होर्डींग कोसळून दुर्घटना

काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या अनेक लाटा येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यापाठोपाठ राज्यातील अनेत भागात उष्णतेच्या लाटानंतर वादळी वाऱ्यानंतर अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार मागील दोन-तीन दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली. त्यानंतर आज संध्याकाळी मुंबई ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने …

Read More »

आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …

Read More »

अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१०९ कोटींचा निधी वितरणास मान्यता

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील …

Read More »

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …

Read More »

गारपीट, अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा

राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळी पाऊस व गारपिटी नुकसानाची पंचनामे…

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, ही राजकारण करण्याची वेळ नाही…

वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट …

Read More »

नाना पटोले यांची खोटक टीका, …शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ …

Read More »

नाना पटोले यांची माहिती,… अवकाळी पाऊस व गारपिटीग्रस्त भागाची पाहणी करणार

अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. व त्यांच्याकडून मिळणा-या …

Read More »