परिवहन विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आज केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, परिवहन विभागातील निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, चाकणकर यांचा राजीनामा झाला, पण मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे भोंदूबाबा खरात याचे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसांवर तपास करताना दबाव
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, सत्तेत बसलेल्या महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि खरात प्रकरणातून समोर आलेली मंत्र्यांची भोंदूगिरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला काळिमा आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. …
Read More »विजय वडेट्टीवार यांची भीती, राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, विधानसभेत मागणी
राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, जर खरा इतिहास शिकवला असता तर ही वेळच आली नसती… हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून केली टीका
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांचा लावण्यात आलेला फोटो काढल्यावरून म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामापासून प्रेरणा घेत टीपू सुलतान यांनीही इंग्रजाच्या विरोधात काम केले असल्याचे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून टीपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजासोबत …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, अभिभाषणात जुन्याच मुद्याची घासून पूसून उजळणी राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक
राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही.हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात जुन्याच मुद्द्यांची घासून-पुसून उजळणी केली असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना …
Read More »धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर हल्लाबोल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना पुकारली. त्यावर बोलण्यासाठी भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलण्यास सुरुवात करत म्हणाले की, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी पहिलाच लक्षवेधीचा प्रश्न हा धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनस संदर्भातील आहे. राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी बोनस दिल्यानेच राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. मात्र …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा इशारा, भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन चंद्रपूर महापालिका प्रकरणी माफी मागितली ही बातमी खोडसाळपणा, माझी चूक नाही तर माफी का मागीन?
भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराने भारतातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रातील मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. काल दिल्ली इथे काँग्रेस पक्षश्रेष्ठी बरोबर झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका करार, त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चा …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा, शिंदेसेना, एमआयएम एकच, हिरव्या पतंगाचा मांजा भगवा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,
भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत …
Read More »पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ
पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. …
Read More »
Marathi e-Batmya