केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, विरार-अलिबाग, पुणे रिंग रोड प्रकल्प गैरव्यवहाराची चौकशी करा भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित करा
विरार-अलिबाग कॉरीडर आणि पुणे रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादनात गैरव्यवहार झाला आहे. वसई-विरार भूसंपादनात देखील गैरव्यवहार झाला आहे. या दोन्ही गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच हा गैरव्यहार करणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्याची चौकशी करून त्यास तात्काळ निलंबित करावे,अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत …
Read More »विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूबः अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा महायुतीने भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली
राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज करत अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहे. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …
Read More »उदय सामंत यांचे आश्वासन, चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करणार विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर
रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा असा एकूण ७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे …
Read More »नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धरले धारेवरः अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट नाशिकमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रे काढून नीट परीक्षा दिली, सरकार झोपा काढत आहे का?
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का मंत्री अनिल पाटील यांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार सह विरोधकांचा आक्षेप
राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल असा सवाल करत पहिल्याच प्रश्नांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला आज विधानसभेत पावसाळी अधिवेशात केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून हफ्ता वसुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन
पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यात ४५० ओपन टेरेस हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव, कल्याणनगर भागात …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका,… महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी; वीज बील माफी द्यावी
राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, जातनिहाय जणगणना करा पोलिस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे
महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …
Read More »
Marathi e-Batmya