मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …
Read More »काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!
अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण अधिसूचना
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?
राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आली आहे यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा इशारा, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींच्या अतुलनीय योगदानामुळे आजचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या अभिमाने साजरा करतो आहे. पण प्रजासत्ताक दिन साजरा करण्याऐवजी महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी …
Read More »विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपावर अखेर आरोग्य विभागाचा खुलासा
मागील दोन आठवड्यापासून काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्याकडून आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सतत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर जवळपास आठभडानंतर आरोग्य विभागाने अॅब्युलन्स टेंडर निविदेतील घोटाळ्याप्रकरणी खुलासा आज केला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया …
Read More »आशिष शेलार यांचा पलटवार, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर..!!
मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता; अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही “महा”खोटं बोलला नसता;रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा” शकुनीला आवरले असते तर अशी “महा” पत्रकार परिषद घेण्याची, नौटंकीची वेळ आली नसती…जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर… अश्या म्हणत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, तलाठी भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करा
पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी. या संपूर्ण तलाठी पद भरतीची …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीच्या घटकपक्षांची स्थिती गुलामासारखी..
महविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच दुसरी बैठक होणार आहे. त्यात उर्वरित जागांच्या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. पुढील बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला अंतिम होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा
राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर ८ हजार कोटीपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम …
Read More »
Marathi e-Batmya