येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.

 

About Editor

Check Also

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचे अवकाशवीर एकाच मंचावर राकेश शर्मा–शुभांशु शुक्ला यांची उपस्थिती; सचिन तेंडुलकर करणार गौरव

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *