२७, २८ जूनला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई : प्रतिनिधी

मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या दरम्यान ढगाळी वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होईल. परंतु २९ जूनपासून किमान २ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असल्यामुळे तापमानात परत वाढ होईल. शेतकऱ्यांनी ही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन पेरणीचे आणि लागवडीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मुंबईसह कोकणात देखील या आठवड्यात चांगला पाऊस पडत राहील, असे मत हवामान तज्ज्ञांनी दिले आहे.

About Editor

Check Also

आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती

भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *