मुंबईः प्रतिनिधी
यावर्षी देशात सरासरी पाऊस होईल. त्याचबरोबर हे प्रमाण ९६ टक्के राहणार असल्याची माहिती राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आली. “हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिस-या क्रमाकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नाही. तसेच सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून आहे.
पर्जन्यमानाचे प्रमाण हे प्रदीर्घ काळासाठी सरासरी ९६ टक्के राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले असून जूनपासून सुरुवात होणा-या संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामासाठी हवामान खात्याच्या मते पावसाची सरासरी, ९६ टक्के आणि १०४ टक्केच्या ५० वर्षांच्या सरासरीच्या १०४ सेंटीमीटरमध्ये निर्धारित करते. जुलै महिन्यात देशात ९६ टक्के तर ऑगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तविला आहे. देशभरात वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस हा येत्या तीन-चार महिन्यात पडत असून त्यावरच भारतातील कृषी क्षेत्राचं यश अवलंबून असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
विभागवार पाहिले तर पश्चिमोत्तर भारतात मान्सून काळात ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर या काळात मध्य भारतात याच्या १०० टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर पूर्वोत्तर भारतात मान्सून काळात ९१ टक्के पाऊस होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.
Marathi e-Batmya