पोलिस कोठडीनंतर आता नितेश राणे यांना १८ पर्यत न्यायालयीन कोठडी सिंधुदूर्ग न्यायालयाने सुणावला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना कार्यकर्त्ये संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुणावन्यात आलेली पोलिस कोठडीची मुदत आज संपत आली असताना सिंधुदूर्ग पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुणावल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली. तसेच त्यांच्या नारायण राणे यांच्या मालकीचे गोव्यातील रिसार्टवर घेवून जाण्यात आले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सिंधुदूर्ग येथे आणून येथेही चौकशी करण्यात आली. तसेच हल्ला प्रकरणातील नितेश राणे यांचा साथीदार राकेश परब यांना समोरासमोर बसवूनही चौकशी करण्यात आली.

आज नितेश राणे यांची पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना १८ फेब्रुवारी पर्यत न्यायालयीन कोठडी सुणावन्यात आली. यावेळी सरकारी वकील प्रदिप घरत यांनी आणखी ८ दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. तसेच नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाला का याची तपासणी करायची असून त्यांना त्यासाठी पुणे घेवून जायचे असल्याचा युक्तीवाद करत आणखी तपास करायचे असल्याने पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली.

त्यावर नितेश राणे यांचे वकील सतीश माने-शिंदे यांनी यास विरोध करत यापूर्वीच दोन दिवसांची पोलिस कोठडी नितेश राणे यांना दिलेली असून पुन्हा एकदा त्यांना पोलिस कोठडी देवू नये अशी विनंती युक्तीवाद करताना न्यायालयास केली. त्यावर न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी नितेश राणे यांना सुणावली.

दरम्यान नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी दिल्याने नितेश राणे यांना जामिन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात असून नितेश राणे यांनीही आज सत्र न्यायालयात जामीनासाठी नव्याने अर्ज केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *