Breaking News

धर्मा पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयात आत्महत्त्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचीही आपण व सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. ज्या कारणांसाठी त्यांनी आत्महत्त्या केली त्याची शासनाकडून अजून पूर्तता न झाल्यामुळे थर्मा पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या कुटुंबियांनी अजून केले नाही. शासनासाठी ही शरमेची बाब असून पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे ही उपस्थित होते.

त्याचबरोबर राज्य सरकारच्या सर्वसामान्यांविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होणार असला तरी येत्या २८ फेब्रुवारीला मुंबईत हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

येत्या २८ तारखेला आझाद मैदान येथे पक्षाचे सर्व नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केले जाईल. विदर्भातून सुरू झालेले हल्लाबोल आंदोलन नंतर मराठवाड्यात व उत्तर महाराष्ट्रातही झाले. या आंदोलनाचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात केला जाणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी येत्या २६ फेब्रुवारीला पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे, असे ते म्हणाले.

या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यालाही जनतेचा, खास करून तरूण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. आताच सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र, कार्यक्रम केला. दोन वर्षांपूर्वी मेक इन महाराष्ट्र, कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमातून आठ लाख कोटींची गुंकवणूक आल्याचा दावा सरकारने केला होता. ही गुंतवणूक कोठे झाली? किती जणांना रोजगार मिळाला? त्यात कुशल व अकुशल किती, ही सर्व माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत