Breaking News

मुंबईचा पोलिस आयुक्त कोण? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

कोणाला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज, कोणाचा मतदार संघ कोणासाठी सोडायचा यावरून नाराजी, कोण हवेत गोळाबार करतोय, तर कोण सरकारी कार्यालयाची तोडफोड तर कोण अधिकाऱ्याला थोबाडतोय यामुळे राज्य सरकारात नाराजी, अशी नाराजी नाट्य राज्यात चालूच आहे. मात्र या सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्येच चक्क नाराजी पसरलेली आहे. आता ही नाराजी सासु सुनेच्या भांडणासारखी आहे की, नणंद भावजय सारखी आहे हे पहावं लागेल.

मुंबई तसेच राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये चांगलेच मतभेद झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मात्र या दोघांमधील मतभेदांमुळेच पोलिसांच्या बदल्या रखडल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मधील या मतभेदामुळे राज्यातील सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे का, मंत्री पदावरून नाराजी आमदारांच्या वर्तनावरून नाराजी हे सर्व काही पाहता शंका कुशंका उपस्थित होत आहेत. याचे कारण असे की, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी कार्यक्रमासाठी एकत्र येणे टाळले आहे. तर काल दिवसभर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे सोबत कार्यक्रम होते. परंतु हे दोघेही एकमेकांसोबत कार्यक्रमात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात असलेले मतभेद वाढत आहेत का, असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील वरीष्ठ अधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांच्या नियुक्त्या वरुन या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसतेय. शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीतही पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यावरून चर्चा झाली. पण दोघांत एकमत झालं नाही अशी माहिती आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी मात्र शिंदे आणि फडणवीस या दोघांनी एकाच ठिकाणी कार्यक्रमाकरीता एका मंचावर येण्याचं टाळलं. यावरून शंका घेण्यास अधिक वाव मिळतो.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वर्तनामुळे होत असलेली सरकारची बदनामी, विरोधकांना टीकेची संधी देऊ नका, अशी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समज दिली. यावरूनही झालेली नाराजी सुद्धा एकमेकामधील मतभेद वाढण्यास कारणे असू शकतात.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे दिल्ली दौऱ्यावरबाबत उत्सुकता निर्माण होत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुक भाजपाची माघार, तसेच राज्यातील राजकीय मुद्दे यावर केंद्रीय नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीस फडणवीस सहभागी होणार आहेत. तसेच हिमाचलच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत