‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मत विचारले असता शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारच निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. या अधिवेशनात भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठीही विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक आणून केंद्र सरकार इंडिया आघाडीतील INDIA हा शब्द बदलण्याच्या तयारीत आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारला खुले आव्हान दिले असून कुणीच हे नाव बदलू शकत नाही तसा अधिकारच कुणाकडे नाही असेही सांगितले.

इंडिया आघाडीच्या नाव बदलण्याच्या विधेयकाच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मला तशी काही माहिती नाही. उद्या मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठक बोलावली आहे. इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची उद्या बैठक आहे. या बैठकीत या गोष्टींचा विचार होईल. पण हे नाव हटवण्याचा आधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही देशाशी निगडीत असलेले नावांबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षांना का असते हे मला समजतं नाही असे म्हणत शरद पवार यांनी थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्रपती यांच्या लेटरहेडपासून अनेक ठिकाणी इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव वापरण्यास केंद्रातील मोदी सरकारने आजपासून सुरुवात करण्यात आल्याची चर्चा देशाच्या सर्वचस्तरात आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, हे नाव त्याकाळी मसुदा समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे नाव निश्चित केले. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे निश्चित केल्याचे सांगितले.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *